Tuesday, December 1

जग़णं बिगणं

जग़णं बिगणं


माणसं-बिणसं
फिरतात-बिरतात.
होडया-बिडया
तरतात-बिरतात.
चांदण्या-बिंदण्या
प्रकाशतात-बिकाशतात.
कळ्या-बिळ्या
उमलतात-बिमलतात.
महागाई-बिहगाई
वाढते-बिढते.
अटका-बिटका
होतात-बितात.
पोरं-बिरं
मरतात-बिरतात.
प्रश्नं-बिश्नं
पडतात-बिडतात.
बूट-बीट
झिजतात-बिजतात.
तारा-बिरा
तुटतात-बिटतात.
पाणी-बिणी
संपतं-बिंपतं
वर्ष-बिर्ष
सरतात-बिरतात.
देव-बीव
असतो-बिसतो

आभाळात-बिभाळात.

No comments:

Post a Comment