Tuesday, December 1

सावल्या

सावल्या लांबताना घर आखूड होतं
हात पोचतात दूरच्या फांदीला
तेंव्हा फळ जमिनीवर येतं


राग असतो खोलवर
घर करून राह्यलेला
उंबरठयावर मात्र
हास्य उभा असतं. कसंही केंव्हाही
घरी
आपल्याला हे ओळखता येतं


दृष्टी कमी होते
आणि हाडं गंजून जातात
केसांच्या दशा
सर्व बाजूस लोंबतात
वार्र्याला दिशा किती असतात !
प्राणी जसे मरून पडतात
तसे आपण मरतो
घरामध्ये
धूळ होतो….

and for his son:

तुला माझ्यापर्यंत यायचं तर
कागदी पानावर उतरावं लागेल
ओळीत उभं राहावं लागेल ...

No comments:

Post a Comment