ती गेली तेव्हां रिमझिम
पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणें
हा सूर्य सोडवित होतां
तशि सांजही अमुच्या दारीं
येऊन थबकली होतीं
शब्दांत अर्थ उगवावा
अर्थांतून शब्द वगळतां
ती आई होती म्हणुनि
घन व्याकुळ मीही रडलों
त्यावेळी वारा सावध
पाचोळा उडवित होता
अंगणांत गमलें मजला
संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हां
कंदील एकटा होता
हे रक्त वाढतानाही
मज आता गहिंवर नाहीं
वस्त्रांत द्रौपदीच्याही
तो क्रुष्ण नागडा होतां
ती गेली तेव्हां रिमझिम
पाऊस निनादत होता
No comments:
Post a Comment