Monday, November 30

सुख आणि रबिआ

रबिआ

तुझा विश्वास होता देवावर
तुडुंब
पण त्याचा कुठं विश्वास होता तुझ्यावर

सुख आणि रबिआ
रबिआ आणि सुख
यांची गाठभेट म्हणून होऊच द्यायची नाही
आयुष्यात कधीही
त्यांची चुकामुकच होत रहावी नेहमी
अशी मुद्दामच सगळी आखणी केलेली होती त्यानं अगदी
पहिल्यापासनं

सुखाचा वाराही तुला लागू नये
म्हणून फार जपायचा तो
झुळूक जरी लागली
तरी तू विसरायचीस त्याला एकादवेळेस
म्हणून घाबरायचा की काय
कुणास ठाऊक?

No comments:

Post a Comment